क्राइम
घरफोडी करून रोख रक्कमेसह सोने लंपास…..!
केज दि.29 – अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील गव्हाच्या कोठीत ठेवलेले नगदी ८ हजार रूपये व ७ ग्रॅमची बोरमाळ असा २३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना तांबवा ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तांबवा येथील रतन भगवानराव लांब या मजूर महिलेचे गावात घर असून त्यांच्या भाच्चीसूनाची परीक्षा पुणे येथे होती. त्यामुळे घराला कुलूप लावून त्या दोघी पुण्याला गेल्या होता. घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घराची झडती घेऊन गव्हाच्या कोठीत ठेवलेले नगदी ८ हजार रुपये व १५ हजार रुपये किंमतीची ७ ग्रॅमची सोन्याची बोरमाळ असा २३ हजार ४०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
दरम्यान, पुण्याहून परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आल्याने शुक्रवारी रतन चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक दिलीप गित्ते पुढील तपास करत आहेत.