आसाराम बापूच्या भक्तांसाठी निराशाजनक बातमी…….!!!
नवी दिल्ली दि.6 – बलात्कार प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला गेल्या पाच दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांना जोधपूर येथील एम्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलं आहे.
आसाराम बापू 2014 पासून बलात्कार प्रकरणात जोधपुर सेंट्रल जेलमध्ये कैद आहे. काही वैद्यकीय चाचण्या करून त्याला रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. आज सकाळी 11 वाजता तुरुंगातून आसाराम बापूला रुग्णालयात नेत असताना जोधपुर येथील एम्सबाहेर त्यांच्या भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच ही गर्दी हटवण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यापूर्वी मे महिन्यात आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याला एमडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्यावर असलेली शिक्षा माफ करून त्यांना आयुर्वेदिक उपचारासाठी उत्तराखंडमध्ये जाण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका न्यायालयात करण्यात आली होती. परंतु, त्यांचा गुन्हा सर्वसामान्य गुन्हा नसल्यामुळे त्याच्यावर दया दाखवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं होतं.
दरम्यान, शनिवारी आसाराम बापूला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच पुढचे काही दिवस त्याच्यावर एम्समध्ये उपचार होणार आहेत. त्याचबरोबर एलिव्हेटेड लिव्हर एंजाइम आणि युरीन इन्फेक्शनचा त्रास त्यांना होत असल्याचं सांगितलं जात आहे.