राजकीय
कधी नव्हे एवढी महागाई सात वर्षांत वाढली – देविदास भन्साळी……!
उंदरी येथे काँग्रेसचे जन जागरण अभियान.......!
केज दि.२० – मागील सात वर्षांपासून देशात भाजपाची सत्ता आली आणि मागील ७० वर्षांत कधी वाढली नाही तेवढी महागाई या सरकारने वाढवली. यामुळे सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले असल्याचे मत बीड जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देविदास भन्साळी यांनी व्यक्त केले. ते केज तालुक्यातील उंदरी येथे जन जागरण अभियानांतर्गत कार्यक्रमात बोलत होते.
वाढलेली महागाई व सतत येणारे अस्मानी संकट यामुळे सर्वसामान्य माणसाचे गणित पूर्णपणे बिघडले असून याला सर्वस्वी केंद्रातील भाजपा सरकार जबाबदार असल्याचे भन्साळी म्हणाले. यावेळी बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी देखील भाजपा वर टीका करत मोदीं फक्त विका विकी आणि फेका फेकी करण्यात माहीर असून विकासाच्या दृष्टीने त्यांनी अद्यापही काम केलेले नाही. त्यामुळे देशाला या संकटातून केवळ कॉंग्रेसच वाचवू शकतो आणि लोकांना काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे देशमुख म्हणाले. यावेळी आदित्य पाटील, राहुल सोनवणे यांचेही भाषणे झाली.
तसेच उंदरी मध्ये मागच्या तीन चार वर्षांपूर्वी वीज सबस्टेश मंजूर आहे मात्र त्याबाबत अद्यापही पाठपुरावा न केल्याने ते तसेच पडलेले आहे. मात्र हा प्रश्न आपण काही दिवसांत निकाली लावू व येणाऱ्या हंगामात तुम्हाला तुमच्याच सबस्टेशन ची लाईट देऊ असा शब्द आदित्य पाटील यांनी खासदार रजनीताई पाटील यांच्या वतीने ग्रामस्थांना दिला.
या अभियान अंतर्गत दि.१९ रोजीच जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, बाळासाहेब ठोंबरे, संतोष सोनवणे, प्रविण देशमुख, अशोक देशमुख आदी मंडळींनी गावातच मुक्काम करून गावकऱ्यांशी संपर्क साधला.तर दि.२० रोजी बीड जिल्ह्याचे निरीक्षक देविदास भन्साळी यांच्या उपस्थतीत गावातून फेरी काढून कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी देविदास भन्साळी, राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगट, प्रविण शेप, बाळासाहेब ठोंबरे, संतोष सोनवणे, समीर देशपांडे, प्रताप मोरे, प्रविण देशमुख, अशोक देशमुख यांच्यासह उंदरी गावचे सरपंच संतोष ठोंबरे, मुन्ना ठोंबरे, नितीन ठोंबरे, संदिप शितोळे, भागवत ठोंबरे, कल्याण ठोंबरे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.