लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आणखी एक नियम…….!
लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आणखी एक नियम......!
औरंगाबाद दि.२६ – कोरोनाचं संकट कमी झाल्यानं अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळं लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला आहे. लशीचा एकही डोस घेतला नसेल त्यांना दारु मिळणार नाही. शिवाय बारमधील कर्मचारी दारू दुकानातील कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण केवळ 64 टक्के इतके आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. त्यापासून मद्य प्रेमीही सुटले नाहीत. लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लसींचा पहिला डोस सक्तीचा करण्यात आला आणि लसीकरणाचा टक्का वाढला. औरंगाबादेत किमान लसीचा एक डोस घेतल्या शिवाय आता दारूचं मिळणार नाही आणि बारमध्ये बसूनही पिता येणार नाही. त्यामुळे मद्य प्रेमींची चांगलीच गोची प्रशासनाने केली आहे. तसेच बार चालकांना आणि बारमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही लसीचे दोन डोस घेणं बंधनकारक असणार आहे.औरंगाबाद जिल्ह्यात या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी दारू दुकानवरील गर्दी थोडी ओसरली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत पहिला आणि ख्रिसमस अखेरपर्यंत दुसरा डोस जास्तीत जास्त पूर्ण करण्याच राज्य सरकारचं उद्दीष्ट आहे. हे दोन ही डोस यशस्वी झाल्यानंतर नवीन वर्षात दैनंदिन जनजीवन सुरुळीत करण्याची राज्य सरकारची तयारी आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू म्हणजे किराणा, स्वस्तधान्य, पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तू या लसीकरणाचा पहिला डोस घेतल्या शिवाय मिळणार नाहीत असा निर्णय घेतला. या निर्णयानंतर औरंगाबाद जिल्यात रोज 10 हजार लस वाढल्याचा दावा जिल्हाधिकारी यांनी आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही दुकानात खरेदीसाठी लसींचा पहिला डोस घेतला नसेल तर तुम्हाला दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शॉपिंग मॉल, किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीच्या पहिल्या डोसच प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंप, गॅस, रेशन दुकानात खरेदी करायचे असेल तर कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाईल. मात्र बिल देताना लसीकरणाचा पहिला डोस प्रमाणपत्र आवश्यक आहे.