Omicron

ओमीक्रॉन बाधित रुग्णांमध्ये ”ही” लक्षणे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे……! 

4 / 100

मुंबई दि.३ – कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची चांगलीच धास्ती वाढवली आहे. कारण कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron Variant) 2 रूग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) म्हणण्यानुसार बुधवारी रात्री उशिरा देशात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आले असून त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू आहे. यामुळे ओमिक्रॉनची आता सर्वांनीच धास्ती घेतली आहे. ओमिक्रॉनची नेमकी कोणती लक्षणे आहेत, हे आपण बघणार आहोत.

ओमिक्रॉनच्या रुग्णामध्ये साधारणतः ही आहेत लक्षणे…….!

सौम्य डोकेदुखी,कोरडा खोकला,संपूर्ण शरीरामध्ये वेदना,घसा खवखवणे,खूप थकवा

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांना ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने स्नायू दुखणे, घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि थकवा ही लक्षणे दिसून आली आहेत. मात्र, डॉक्टरानी असेही सांगितले आहे की, फक्त हीच लक्षण असली म्हणजे ओमिक्रॉन असावा असेही काही नाही. परंतू बहुतांश रूग्णांमध्ये ही लक्षणे आढळून आली आहेत.

दरम्यान,व्हेरिएंट ओमिक्रॉनचा अजून पूर्णपणे अभ्यास करण्यात आलेला नाहीये. अनेक देशांमध्ये तज्ञ त्याचा अभ्यास करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) नुसार, B.1.1.1.529 प्रकाराच्या संसर्गानंतर आतापर्यंत कोणतीही असामान्य लक्षणे आढळलेली नाहीत. एनआयसीडीने असेही नोंदवले आहे की, ओमिक्रॉनच्या संक्रमितपैकी काही रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीयेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close