ओमीक्रॉन बाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा……!
नवी दिल्ली दि.७ – सध्या Omicron व्हेरियंटमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशातही Omicron चे रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. अशातच ऑक्सफोर्ड- एस्ट्रोजेनेका कोरोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. गिल्बर्ट यांनी आगामी काळात आतापेक्षा भयानक साथ येणार असल्याचा इशारा दिला आहे.
गिल्बर्ट यांनी सांगितलं, ‘नवीन येणाऱ्या कोरोना लसीमुळे कोरोना लसीची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोनाच्या नवीन विषाणूबाबत अधिक माहिती समोर येत नाही. तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आगामी काळात येणारी साथ याहीपेक्षा संसर्गजन्य आणि घातक असेल,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. गिल्बर्ट पुढे ओमिक्रॉनबद्दल बोलताना म्हणाल्या, ‘या विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे या विषाणूची क्षमता वाढली आहे. या विषाणूची रचना वेगळी असल्याने कदाचित कोरोनाच्या लसीमुळे तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती या विषाणूला रोखू शकणार नाही,’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात पहिल्यांदा कल्याण डोबिंवलीमध्ये रूग्ण आढळला होता. त्यानंतर पुणे शहरात एकाच कुटुंबातील तब्बल 6 सदस्यांना ओमिक्राॅनची लागण झाल्याचं उघड झालं होतं. अशातच आता मुंबईत दोन रूग्ण आढळले आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात हे रूग्ण दाखल आहेत. राज्यात वाढत चाललेली रूग्ण संख्या पाहता सरकारकडून निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.