#Election
केज न.पं. निवडणुक २०२१ : पहा किती झाले अर्ज दाखल तर किती झाले मायनस…..!
केज दि.७ – नगरपंचयात निवडणुकीत ओबीसी आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर १७ पैकी १३ प्रभागासाठी निवडणूक होणार आहे.आज अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण ११९ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून यापैकी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके किती उमेदवार रिंगणात राहतात हे स्पष्ट होणार आहे.
केज नगरपंचयात च्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु काल ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर निवडणूक होणार की पुन्हा लांबणीवर पडणार असा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु ओबीसी आरक्षणाचा तिढा जरी असला तरी उर्वरित जागांसाठी निवडणूक निर्धारित वेळेत होणार हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
होऊ घातलेल्या १३ जागांच्या निवडणुकीसाठी प्रभाग तीन साठी (१०), चारसाठी (९), पाचसाठी (४), सहासाठी (७), सातसाठी (८), नऊसाठी (६), दहासाठी (१५), अकरासाठी (१२), तेरासाठी (७), चौदासाठी (११), पंधरासाठी (१०), सोळासाठी (१२) तर सतरा प्रभागासाठी (८) अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तर १,२,८ आणि १२ या चार प्रभागासाठी ३२ अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु सदरील प्रभागाची निवडणूक लांबणीवर पडली आहे.
दरम्यान येत्या १३ तारखेला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यापैकी किती काढता पाय घेतात आणि किती मैदानात राहतात हे स्पष्ट होणार आहे. १३ तारखेलाच चिन्हांचे वाटप होणार असून २१ तारखेला मतदान आणि २२ तारखेला निकाल लागणार आहे.