#Accident

मोठी दुर्घटना……हेलिकॉप्टर कोसळले, माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत करत होते प्रवास……!

8 / 100

चेन्नई दि.८ – तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) कोसळलं. या दुर्घटनेत चारजण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) हे पत्नीसह प्रवास करत होते. या अपघातात तेही जखमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, लष्कराकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत,
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर,लेफ्ट. कर्नलहरजिंदर सिंग,गुरुसेवक सिंग,जितेंद्रकुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा, हवालदार सतपाल ईत्यादी प्रवास करत होते. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली.कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर आगाची भडका उडाला. त्यामुळे या दुर्घटनेत काही जण होरपळले आहेत. काही जणांचे मृतदेह मिळाले असून ते 80 टक्के भाजलेले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close