#Social

माजी मंत्री पंकजा मुंडेंचा संकल्प ठरला……!

8 / 100

बीड दि.10 – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde Letter Viral) या दरवर्षी गोपीनाथ मुंडे (gopinath munde birth anniversary) यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक वेगळा संकल्प केला आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे. दरवर्षी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर  वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. मात्र यावर्षी मुंडे समर्थकांना गडावर न येता ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत.

पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, यंदा सेवेचा संकल्प करुयात. यावेळी आपण काही वेगळं करुयात. कष्टकरी, मजुरांकडे जा, त्यांची सेवा करा. त्यांना घरातून डबा बनवून नेत खायला घाला, त्यांच्या डब्यातला तुम्ही खा. ज्यांचं मुंडे साहेबांवर प्रेम आहे ते असे कार्यक्रम करतील. आपण केलेल्या उपक्रमाच्या भावना माझ्या सोशल मीडियावर व्यक्त करा. जेव्हा तुम्ही हे काम करत असाल त्यावेळी मी उसतोड कामगारांसोबत हा दिवस घालवणार आहे. हा दिवस कष्टकरी लोकांसाठी साजरा करायचा आहे. हे ज्यावेळी आपण साजरं करत असून त्यापेक्षा मोठा आनंद कोणताही नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

                  पत्रात पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतही नाही. प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले. अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close