#Social
महावितरणच्या सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात ठिय्या आंदोलन…..!
उद्यापासून शेतकरी खंडित वीजपुरवठा परस्पर जोडणी करणार असल्याचा इशारा.....!
केज दि.१४ – महावितरण कंपनीकडून गेल्या महिनाभरापासून जुलमी व सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात व खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज दिनांक 14 डिसेंबर 2021 वार मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेडचे मा.तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांच्या नेतृत्वाखाली 33 KV विद्युत उपकेंद्र ,युसुफवडगांव ता.केज येथे ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनात शेतकऱ्यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच खंडित वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याच्या मागणीसह सक्तीची वीज बील वसुली तात्काळ बंद करावी आदी मागण्या केल्या. आंदोलनात युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय आटोळे,पोलिस उपनिरीक्षक रियाजोद्दीन शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.एक दिवसात खंडित वीज पुरवठा पूर्ववत केला नाही तर उद्यापासून स्वतः शेतकरी रोहित्रा वर चढून महावितरणच्या अधिकारी व लाइनमन यांच्या परस्पर वीजपुरवठा जोडतील. परिणामी उदभवणाऱ्या परिणामास महावितरण अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा उपकार्यकारी अभियंता केज श्री.आंबेकर यांना दिला आहे.
आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे,सतिष शिंदे,स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जि.उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ,अशोक साखरे,रामदास नांदे,अरविंद मोरे,दीपक नांदे,सोमनाथ भूमकर,सुग्रीव करपे,नारायण काकडे, अविनाश करपे,मनोहर गोरे,सचिन इंगळे,गणेश इंगळे,उमेश खोडसे,हनुमंत करपे,लहू मोडवे,श्रीधर मोडवे, भाई प्रवीण खोडसे,माणिक जाधव, बब्रुवान कणसे,बालासाहेब निकम,गणेश कोरसाळे आदि पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.