#Social
आईच्या पुण्यस्मरणा निमीत्त मोफत कान-नाक-घसा रोगनिदान व उपचार शिबिर……!
डॉ. आकाश बचुटे यांची कालकथीत आईला अनोखी श्रद्धांजली
केज दि.२४ – आपल्या दिवंगत आईचे कायम स्मरण रहावे. दुर्दैवाने आईच्या मृत्यू नंतर ही तिच्या स्मृती निमित्त गोरगरीब लोकांची सेवा करून कायम त्यांच्या आशीर्वाद पाठीशी रहावा म्हणून उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. आकाश बचुटे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री आशाबाई रावसाहेब बचुटे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिना निमित्त कान-नाक-घसा यांच्या आजारांचे मोफत निदान व उपचार शिबिर आयोजित केले आहे.*
कळंब जि. उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात “आशा कान-नाक-घसा हॉस्पिटलचे” प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. आकाश बचुटे, रा साळेगाव ता. केज जि. बीड यांच्या मातोश्री आशाबाई बचुटे यांचे दि. २८ डिसेंबर २०१४ रोजी दुर्दैवी निधन झाले होते.
आपल्या मुलांनी वैद्यकीय सेवेत नाव कमवावे आणि त्यांनी गोरगरीब लोकांची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी डॉ. आकाश बचुटे (MS-ENT)आणि त्यांचे भाऊ विवेक बचुटे (BDS) यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू होते. त्या नंतर सन २०१८ मध्ये कळंब येथे डॉ. आकाश बचुटे यांनी आईच्या नावाने सर्व सोईनी युक्त अशा “आशा कान-नाक-घसा हॉस्पिटल” हे विविध आजारावरील उपचारासाठी अद्यावत हॉस्पिटल सुरू केले. अल्पावधीतच डॉ आकाश बचुटे यांच्या उपचार आणि अचूक रोगनिदान यामुळे त्यांचा नावलौकिक वाढला आहे. परिसरातील रुग्णांना पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील वैद्यकीय सेवेच्या तोडीसतोड उपचार आणि तेही अगदी अल्प दरात मिळू लागली आहे. त्यांच्या हॉस्पिटल मध्ये कानाचे दुबिनिद्वारे ऑपरेशन करून कानाचा पडदा बसवणे. वारंवार फुटणाऱ्या कानावर उपचार. कानाच्या वेड्या-वाकड्या आकारावर प्लास्टिक सर्जरी. कमी ऐकु येणे याची मशिनद्वारे तपासणी व श्रवणयंत्र बसवणे. नाकातील वाढलेल्या हाडाचे दुर्बीणीद्वारे ऑपरेशन. ॲलर्जी, सर्दी तपासणी व उपचार. अपघातात नाकाच्या हाडाचे फ्रॅक्चरवर उपचार. टॉन्सील, घशातील व मानेवरील विविध गाठीवर ऑपरेशन. थायरॉईडच्या गाठीची तपासणी व उपचार. तोंडातील कॅन्सरवरील तपासणी व उपचार. कान, नाक, घसा यामध्ये अडकलेल्या वस्तु दुर्बिनीद्वारे काढणे. जन्मत: मुकबधिर मुलांवरील तपासणी व उपचार. असे उपचार केले जातात.
दरम्यान दि. २७ डिसेंबर सोमवार रोजी कालकथीत आशाबाई रावसाहेब बचुटे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिना निमित्त आशा हॉस्पिटल येथे कान नाक आणि घशा संदर्भातील विविध रोगांची तपासणी व उपचार याचे मोफत तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले आहे. या
शिबीरात सतत कानातुन पू येणे. कमी ऐकु येणे. नाकाचे वाढलेले हाड, ॲलर्जी,सर्दी यासह टॉन्सिलच्या गाठी व तोंडातील अल्सर (तोंड येणे), थायरॉईड गाठी, रक्तातील तपासणी व अशा आजारांची तपासणी व उपचार हे अगदी मोफत करण्यात येणार आहेत.
याचा लाभ बीड उस्मानाबाद आणि परिसरातील गरजूनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. आकाश बचुटे व त्यांचे भाऊ डॉ. विवेक बचुटे तसेच विद्याभूषण बचुटे, बाळासाहेब बचुटे आणि त्यांचे सहकारी हे ऑनररी सेवा निवृत्त कॅप्टन रावसाहेब बचुटे, डॉ जे एन सय्यद, अनंत बचुटे, अनिल गायसमुद्रे, वासुदेव सावंत, सोमनाथ सावंत सर, ज्योतिराम बचुटे, विजयी बचुटे, कालीदास सावंत, सतीश बचुटे, बलभीम बचुटे, अशोक बचुटे आणि पत्रकार गौतम बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.