विधानभवनात कोरोनाचा शिरकाव, तब्बल 35 जणांना कोरोनाची लागण……!
मुंबई दि.२७ – विधान भवनात हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. असं असतानाच विधान भवनातून एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनात 35 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. 2300 जणांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने विधान भवनात भितीचं वातावरण पसरलेलं आहे.
पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये एकाही आमदाराचा समावेश नाही. सुरक्षेसाठी असलेले पोलिस आणि आमदार, मंत्र्याचे पी ए यांचा समावेश आहे. त्यामुळे आता हे पोलिस, पीए मागील आठवड्यापासून कुठे कुठे फिरले आहेत, याची चौकशी सुरु आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून विधीमंडळात सतर्कता बाळगळी जात आहे.हिवाळी अधिवेशन 5 दिवस घेतलं जातं. पहिल्या आठवड्यात 3 दिवस आणि दुसऱ्या आठवड्यात 2 दिवस, अशा पद्धतीने अधिवेशन घेतलं जात. त्यामुळे दोन्ही आठवड्याच्या सुरूवातील विधीमंडळातील कर्मचाऱ्यांसह मंत्री आणि आमदारांची चाचण्या केल्या गेल्या होत्या. यामध्ये 35 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती अजूनही पूर्णपणे ठीक नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. चाचणी पॉझिटीव्ह आलेल्यांपैकी कोणाचा मुख्यमंत्र्याच्या कार्यालायात वावर होता का?, याचा तपास सध्या आरोग्य विभाग करत आहे.