लॉकडाउन बाबत आढावा बैठकीत झाली चर्चा, निर्बंध कठोर करण्याचा झाला निर्णय……!
मुंबई दि.५ – कोरोनाचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णंख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये राज्यातल्या कोरोना स्थितीवर चर्चा करण्यात आली. कोरोना आढावा बैठकीत तुर्तास राज्यात लाॅकडाऊन होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत. तसेच केंद्राने निर्णय घेतल्या प्रमाणे कॉरंटाईन चा कालावधी 10 दिवसां वरून 7 दिवस करण्यात आला आहे. कोरोना चाचणी केल्यापासून सलग तीन दिवस ताप नसेल तर आरटीपीसीआर करून कालावधी कमी करण्यात येणार आहे.
सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. कोरोना आढावा बैठकीला अजित पवारांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, सार्वजनिक आरोग्य आयुक्त व्हीसीद्वारे उपस्थित होते.
दरम्यान, कोरोनाचं सावट काही संपत नसल्याचे दिसत आहे. यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं आता थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये ओमिक्राॅनची धास्ती वाढली आहे. यावर प्रशासनानंही कठोर पाावल उचलायला सुरुवात केली आहे.