क्राइम
कुपाटीवरचे भांडण गेले काठ्या कुऱ्हाडीवर, सातजणां विरोधात गुन्हा दाखल…..!
केज दि.२२ – तालुक्यातील उंदरी येथे शेताच्या बांधाचे कुंपण जाळल्याच्या कारणातून शेतकऱ्यात काठ्या, लोखंडी गज व कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी झाली असून सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दि. २१ जानेवारी रोजी ६.३० वा. उंदरी ता. केज येथील महादेव अप्पासाहेब पवार हे त्यांचे भाऊ रामराव अप्पासाहेब पवार यांना बांधावरच्या कुपाट्या कोणी काढल्या हे विचारीत असताना त्यांच्या भावकीचे बलभीम निळुबा पवार, अभिषेक बलभिम पवार, अशोक दामोदर भोसले, मंदा अशोक भोसले, रेखा बलभिम पवार गिता वचिष्ट पवार, वचिष्ट निळुबा पवार सर्व रा. उंदरी पवार वस्ती हे असे एकत्र येऊन हातात लोखंडी गज, काठ्या कुऱ्हाडी घेवुन आले. महादेव पवार यास ते म्हणाले आमचे बांधावरील कुपाट्या काढून का जाळल्यास ? असे म्हणुन बलभिम निळुबा पवार यांने गजाने कपाळावर मारून जखमी केले. वचिष्ठ निळुबा पवार यांने गजाने ऊजव्या हाताचे दंडावर मारले. त्यांचा भाऊ भांडण सोडवीण्यास आलस असता त्यालाही बलभिम पवार यांने गजाने मारून मुक्कामार दिला. रामराव अप्पाराव पवार यास रेखा बलभिम पवार हिने लोखंडी पट्टीने ऊजव्या हाताचे मधल्या बोटावर मारून दुखाःपत केली. तसेच त्याची पत्नी जयश्री महादेव पवार हीस अशोक दामोदर भोसले यांने लाथा बुक्याने व काठीणे मारहान केली व रोहन रामराव पवार आणि भावजई रुख्मिण रामराव पवार यास अभिषेक बलभिम पवार यांनी काठीने मारहान केली.
सदर प्रकरणी महादेव पवार यांनी दि. २१ जानेवारी रोजी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या वरून बलभीम निळुबा पवार, अभिषेक बलभिम पवार, अशोक दामोदर भोसले, मंदा अशोक भोसले, रेखा बलभिम पवार गिता वचिष्ट पवार, वचिष्ट निळुबा पवार सर्व रा. उंदरी पवार वस्ती यांच्या विरुद्ध गु.र.नं. १६/२०२२ भा.दं.वि. १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३,५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड हे पुढील तपास करीत आहेत.