#Social
खात्यावर नजरचुकीने जमा झालेले ३० हजार रु. केले परत……!
केज दि.२६ – तालुक्यातील साळेगाव येथील रमेश इंगळे हा शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविणारा एक सामान्य तरुण शेतकरी. त्यांच्या बँक खात्यावर अचानक एके दिवशी ३० हजार रु. ऑनलाइन बँकिंगच्या गुगल-पे द्वारे जमा झाले. हे ३० हजार रु. जमा झाल्याचा संदेश रमेश इंगळे यांना त्यांच्या मोबाईलवर आला. रमेश इंगळे यांनी तात्काळ हे पैसे कुठुन आणि कसे जमा झाले? याची सविस्तर माहिती घेतली तर, साळेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याद्यापक एस. टी. काळे यांच्या खात्या वरून गुगल-पे द्वारे जमा झाल्याचे समजले. रमेश इंगळे यांनी तात्काळ ही माहिती काळे यांचे सहकारी ज्ञानेश्वर इंगळे यांना दिली आणि त्यांच्याशी संपर्क साधून नजरचुकीने आलेले ३० हजार रु.रमेश इंगळे यांनी परत काळे यांना पाठवून दिले.
रमेश (आण्णा) इंगळे यांच्या प्रमाणिकपणामुळे त्यांचे मित्र बलभीम बचुटे, रवींद्र जोगदंड आणि अनेकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. म्हणून अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे रमेश इंगळे यांनी दाखवून दिले.