राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार…….!
बीड दि.२९ – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शुक्रवारी अहमदगनर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला.यानंतर गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात (Police Recruitment) महत्त्वाची माहिती दिली.राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीमुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5200 पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे. विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळं येत्या काही काळात 5200 पदांवर युवकांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.