#Judgement

मांगवडगाव खून खटल्यामध्ये पाच आरोपींना जन्मठेप……!

6 / 100
अंबाजोगाई दि.०२ –  येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालु असलेल्या मांगवडगाव येथील खुन प्रकरण : विशेष सत्र केस क्र. ४३ / २०२० महाराष्ट्र शासन वि. सचिन निंबाळकर व इतर १३ या प्रकरणात दुसरे सत्र न्यायाधीश मा. श्री व्ही. के. मांडे यांनी पाच आरोपी क्र. १) सचिन मोहन निंबाळकर, २) हनुमंत उर्फ पिंटु मोहन निंबाळकर, ३) बालासाहेब बाबुराव निंबाळकर, ४) राजाभाउ हरिश्चंद्र निंबाळकर, ५) जयराम तुकाराम निंबाळकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
             थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी हे पारधी समाजाचे होते. फिर्यादीचे बामध्ये व आरोपीमध्ये जमीनीबाबत जुना वाद होता. त्या अनुशंगाने आरोपींनी मयत बाबु शंकर पवार यास सन २००६ मध्ये मारहाण केली होती. नंतर सदर जमीनीच्या वादाचा निकाल हा फिर्यादीचे बाजूने लागला होता. त्यामुळे दि. १३/०५/२०२० रोजी सांयकाळी फिर्यादी, मयत बाबु शंकर पवार त्याचे मुले, सुना असे सर्व जण वादग्रस्त जमीनीवर जिवनावश्यक सर्व सामानासह ट्रॅक्टरने गेले असता सर्व आरोपींनी चिडून त्यांचेवर शस्त्रासह दगड फेकुन हल्ला चढवून ट्रॅक्टर अंगावर घातले व त्यांना गंभीर मारहाण केली. त्यामध्ये त्यांनी बाबु शंकर पवार, संजय बाबु पवार, प्रकाश बाबु पवार या तिघांचा खुन केला व ते तिथे शेतातच मयत झाले. या मारहाणी मध्ये दादुली प्रकाश पवार ही देखील गंभीर जखमी झाली होती. परंतु उपचारा दरम्यान तिचा जिव वाचला. तसेच या मारहाणीमध्ये धनराज बाबु पवार, सुरेश शिवाजी पवार, शिवाजी बाबु पवार, संतोष संजय पवार इत्यादी देखील गंभीर जखमी झाले. सदर प्रकरणात फिर्यादी धनराज बाबु पवार याचे फिर्यादीवरून पो.स्टे. युसुफवडगाव येथे गु.र.नं. १०६/२०२० कलम ३०२, ३०७, १२० ब, ३२५, १४३, १४७, १४८, १४९, ४३५, ४२७, ३२३ भा.द.वी. सह कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३ (१) (g), ३(२) (ra), ३ (२) (r) अ. जा. ज. अ. प्र. कायद्यान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार आरोपी अटक करून गुन्हाचा तपास पोलीस अधिकार राहुल धस यांनी करून आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
                    सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात जखमी साक्षीदार, डॉक्टर, पोलीस अधिकारी वगैरे साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली व ती साक्ष ग्राहय धरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. दुसरे सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी पाच आरोपीना शिक्षा ठोठावली.
             या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍड. ए. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहीले व त्यांना ऍड. आर. एम. ढेले, व ऍड. नितीन पुजदेकर तसेच पोलीस पैरवी गोविंद कदम व पो. कॉ. बाबुराव सोडगीर यांनी सहकार्य केले.

दरम्यान सदरील प्रकरणात एकूण 14 आरोपी होते.त्यापैकी 5 जणांना शिक्षा झाली असून  एक आरोपी प्रकरण प्रलंबित असताना मयत झालेला आहे. तर उर्वरित आरोप निर्दोष मुक्त झाले आहेत.  यामध्ये आरोपी क्रमांक 7 अशोक शेंडगे आणि आरोपी क्रमांक 14 बालासाहेब रामलिंग निंबाळकर यांच्या वतीने ॲड. अशोक ससाणे आणि एस. एन. अंबाड यांनी काम बाजू मांडली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close