#Judgement
ऐतिहासिक निर्णय……49 पैकी 38 आरोपींना फाशीची शिक्षा तर 11 आरोपींना आजन्म कारावास…..!
2008 साली गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. सत्र न्यायालयाने 49 दोषी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे तर 11 दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सर्वात जास्त दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोर्टाने 77 पैकी 28 आरोपींची सुटका केली होती. त्यामुळे उर्वरीत 49 आरोपींना काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. न्यायाधीश ए आर पटेल यांनी 8 फेब्रुवारीला 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं. अखेर न्यायालयाने आज निर्णय देत 49 दोषींना शिक्षा सुनावली.
दरम्यान, 26 जुलै 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हदरला होता. या साखळी बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते.