क्राइम

एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई……!

11 / 100
बीड दि.२४ – एएसपी पंकज कुमावत यांनी मागच्या कांही दिवसांपासून अवैध धंद्याविरुद्ध मोठी मोहीम उघडलेली. आहे अनेक गुन्हेगार जेरबंद केले असून अवैध धंदे कांही प्रमाणात बंद झाले आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे कत्तलखान्यावर छापा मारून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
            अधिक माहिती अशी की, दिनांक 23/02/2022रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती मिळाली की,  दौलावडगाव तालुका आष्टी येथील येथील इसम खलील कुरेशी व दलील हरून कुरेशी हे आपले स्वतःचे फायद्याकरता विनापरवाना बेकायदेशीररित्या दौलावडगाव शिवारात डोंगराच्या पायथ्याला पत्र्याचे शेड मध्ये कत्तलखाना तयार करून त्यात बैल व गाईची जनावरांची कत्तल करून तयार केलेले मास टेम्पोमध्ये भरून तो मुंबई येथे विक्रीसाठी पाठवत आहे. सदरची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात  यांना कळविल्याने सहा पोलीस अधीक्षक  पंकज कुमावत यांनी पोलीस अधीक्षक  बीड यांचे मार्गदर्शनाखाली  केजचे सपोनि संतोष मिसळे व त्यांचे उपविभागीय कार्यालयाचे पोलीस आमलदार  यांना पंचा सह सदर  ठिकाणी पाठवून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन दिनाक 24/02/2022 रोजी 00.30 वाजता छापा मारला.  सदर ठिकाणी जनावरांची कत्तल करताना जागीच दिसून आले व व तीन इसम आम्हास पाहून पळून गेले.परंतु मिळालेला इसमांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष पत्र्याच्या शेड ची व शेड समोर असलेल्या आयशर टेम्पो क्रमांक MH 23 W 3983 पाहणी केली असता टेम्पोत व शेडमध्ये 40 जनावरांची कत्तल करून तयार केलेले मास पाच टन किमती 620000 टेम्पो किंमत 400000 व मुजरा साठी येणे जाण्यासाठी लागणारी टोयोटा कंपनीची ईटॉस कार क्रमांक MH 20 – 8080 किमती 300000 असा एकूण 13 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचा समक्ष घटनास्थळ मिळून आलेल्या इसमांना सदर कत्तलखान्याच्या मालका बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की खलील हारून कुरेशी यांचा असून त्यांच्या सांगण्यावरून आम्ही जनावरे कापून टेम्पोमध्ये भरून देत आहोत. त्यावरून पंचांसमक्ष समक्ष घटनास्थळावर मिळून आलेले मांस टेम्पो tito’s  गाडी, गॅस बत्ती, पाण्याचे टॅंक, सत्तुर, चाकू, सुरा जप्त करून पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून  त्यांच्या कडून सदर मासाचे सीएसाठी सॅम्पल घेऊन एकूण 11 आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे अंभोरा येथे गुन्हा दाखल केला आहे.
               सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षक  बीड, सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि संतोष मीसळे, उपविभागीय कार्यालय केज येथील पोलीस आमलदार बालाजी दराडे, सुहास जाधव, राजू वंजारे, सचिन अंहकारे, संजय टूले, पोलीस ठाणे अंभोरा येथील पोउपनि रवी देशमाने, आदिनाथ भडके व पोलीस आमलदार यांनी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close