#Missing
३० वर्षीय तरुण बेपत्ता, आईची केज पोलीसांत तक्रार.…….!
केज दि.४ – केज शहरातून ३० वर्षीय दुध डेअरी चालक तरुण बेपत्ता झाल्याची उघडकीस आली असून नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळून न आल्याने केज पोलीसांत मिसिंग ची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दिलीप नरसिंग चौरे वय ३० (रा. बीड रोड, उमरी, कारखाण्याजवळ, ता.केज) हा डेअरीवर जातो असे म्हणून जेवनाचा डब्बा सोबत घेवुन गेला. डेअरीवर महादेव चौरे, सलीम शेख इश्वर चाळक यांनी मिळुन जेवन केले व तो डेअरीवरून घराकडे जातो म्हणुन गेला. मात्र दिलीप हा रात्री व उशीरापर्यंत घरी न आल्यामुळे त्याच्या आईने दिलीप यास त्याच्या मोबाईलवर फोन लावला परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर इश्वर चाळक यास दिलीप याचे बाबत विचारणा केली असता त्यांनी दिलीप हा घरी गेला आहे असे कळविले. परंतु तो अद्याप पर्यंत घरी आलेला नाही म्हणून त्याचे फोन वर संपर्क साधला परंतु त्याचा संपर्क होत नसल्याने आईने, मुलाने व नातेवाईकांनी दिलीप याचा शोध घेतला परंतु मिळाली नाही. मात्र त्याची मोटारसायकल ( MH23AG9595) ही बीड रोडला डाव्या बाजुला भांगे कॉम्प्लेक्सच्या कमानी समोर लावलेली दिसली आहे. मात्र डेअरीवरून घराकडे जातो असे म्हणुन गेला तो अद्याप पर्यंत आलेला नाही.
दरम्यान, रंग गोरा, उंची पावणेसहा फुट, अंगात चेक्सचा पांढरा शर्ट काळी पँट, शिक्षण २० वी, पायात चप्पल असे वर्णन असून रुक्मिण नरसिंग चौरे यांच्या तक्रारीवरून केज पोलीसांत मिसिंग ची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अहंकारे करत आहेत.