#Social

अंबाजोगाईच्या मातीतच सकारात्मकतेची बिजे – शरद झाडके…….! 

11 / 100
अंबाजोगाई दि.४ – अंबाजोगाईच्या पत्रकारितेला मराठवाड्यात आगळेवेगळे स्थान आहे. अंबाजोगाईची सकारात्मक पत्रकारिता ही समाज उत्थानासाठी महत्वाची ठरली आहे. अंबाजोगाईच्या मातीतच सकारात्मकतेची बिजे असल्याने या ठिकाणची पत्रकारिता बहरत जाते. असे मत अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी बोलताना व्यक्त केले. तर अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये येथील पत्रकार बांधवांची मोठी भुमिका राहिलेली आहे. येथील पत्रकारितेला मोठा वारसा लाभलेला आहे. अंबाजोगाईच्या पत्रकारितेमुळे शहराचा लौकिक वाढला असल्याची भावना अंबाजोगाई माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. अंबाजोगाई येथे केज येथील आदर्श पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
                केज येथील आदर्श पत्रकार समितीच्या वतीने दरवर्षी मराठवाड्यातील नामवंत पत्रकारांना व संपादकांना वेगवेगळे पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संघाने आदर्श भुमिका घेत कोरोना नियमाचे पालन झाले पाहिजे. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यात महत्वाची भुमिका  निभावण्याची काम हाती घेण्यात आले. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाट्यामाटात न करता पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या गावात किंवा त्यांच्या निवासस्थानी जावून पुरस्काराचे वितरण करण्याचे ठरविले. कारण त्यातून गावच्या माणसांसमोर गावच्या पत्रकारांचा सन्मान करण्याची आगळीवेगळी परंपरा सुरु करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, अंबाजोगाईचे माजी उपनगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी, आदर्श पत्रकार समितीचे अध्यक्ष अशोक सोनवणे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. अंबाजोगाई येथे दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अविनाश मुुडेगावकर यांना आदर्श पत्रकार तर दैनिक वार्ताचे संपादक परमेश्वर गित्ते यांना आदर्श संपादक हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी शरद झाडके म्हणाले की, अंबाजोगाईची पत्रकारिता ही नकीच आगळीवेगळी आहे. येथील पत्रकारितेला सकारात्मक पत्रकारितेचा वारसा आहे. या ठिकाणी मी तहसीलदार व उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतो आहे. गेल्या सहा वर्षाच्या कामाचा अनुभव पाहिला तर नक्कीच या ठिकाणी काम करणार्‍या व्यक्तीला सन्मान दिला जातो. कौतुक केले जाते. या मातीतच सकारात्मक पत्रकारितेचे बिजे असून त्यामुळे येथील पत्रकारिता बहरत आहे. शासनाच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यांमध्ये पत्रकारांच्या खूप मोठे योगदान असून अनेक योजना या गोरगरिबांपर्यंत पोहचाव्यात यासाठी पत्रकार बांधवाचा प्रयत्न असतो. त्यामुळे या ठिकाणी काम केल्याचा अनुभव नक्कीच वेगळ असल्याची भावना झाडके यांनी व्यक्त केली. तर राजकिशोर मोदी बोलताना म्हणाले की, अंबाजोगाई शहरातील पत्रकारिता ही सामान्य जनांच्या हिताची आणि भविष्याची चिंता करणारी राहिली आहे. अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये अंबाजोगाईच्या पत्रकारांचा खूप मोठा वाटा आहे. येथल्या पत्रकारितेला मोठा वारसा आणि परंपरा लाभलेला आहे. त्यामुळे सकारात्मक पत्रकारितेमुळे शहराच्या उत्थाणामध्ये मोठी भर पडली आहे. मिळालेल्या पुरस्कार प्राप्त सहकार्‍यांच्या अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
                    यावेळी पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्ती अविनाश मुडेगावकर, परमेश्वर गित्ते यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप दत्तात्रय अंबेकर यांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौतम बचुटे यांनी केले तर प्रास्ताविक विजय आरकडे यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ पत्रकार शिवदास मुंडे, धनंजय देशमुख, धनंजय कुलकर्णी, प्रकाश मुंडे, विजय आरकडे, अनंत जाधव यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमासाठी पत्रकार गजानन मुडेगावकर, एम.एम.कुलकर्णी, योगेश्वरी नुतन विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे, अभिजित गाठाळ, धनंजय सोळंकी, आनंद टाकळकर, राहूल देशपांडे, शुभम खाडे, सतिश मोरे, अतुल जाधव, मारोती जोगदंड, अशोक दळवे, मुशीर बाबा, विनायक जोशी यांच्यासह इतर पत्रकार बांधव व मित्र मंडळी उपस्थित होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close