#Accident
केज तालुक्यात आज पुन्हा १० ते १२ शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक……!
केज दि.१५ – कालच दि.१४ रोजी दुपारी तालुक्यातील गोटेगाव शिवारात आग लागून सात एक्कर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली होती.सदर घटना ताजी असतानाच पुन्हा मंगळवारी दि.१५ रोजी तालुक्यातील सुर्डी सोनेसांगवी शिवारातील १० ते १२ शेतकऱ्यांचा सुमारे २५ एक्कर ऊस जळून खाक झाला आहे. उसातच असलेल्या विद्युत डीपीच्या मेन लाईनला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सुर्डी सोनेसांगवी येथील पद्माकर लांडगे, दशरथ नाईकवाडे, महादेव बाळासाहेब ईखे, अनंत आबासाहेब कणसे, नामदेव पांडुरंग डिकले, हरिभाऊ ईखे, मारुती नानासाहेब कणसे, गणेश डिकले, राहुल डिकले, विठ्ठल ईखे यांच्यासह अन्य दोन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे.
सदरील आग लागल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आग नियंत्रणात आली नाही. त्यामुळे संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. कळंब येथून अग्निशमन दलाची गाडीही आली होती मात्र त्याचा उपयोग झाला नाही.