अमिषाला बळी पडू नका,तात्काळ रिपोर्ट करा…..!
प्रधानमंत्री जन-धन योजना आल्या नंतर भारतात फायनेंशियल इन्क्लूजनमध्ये वेगाने वाढ झाली. या योजनेमुळे ज्या लोकांचे बँक अकाउंट नव्हते, त्या व्यक्तींनी सुद्धा बँकेचे खाते उघडले. योजना लॉन्च केल्यानंतर चार वर्षात देशात 80 टक्के पेक्षा जास्त लोकांनी बँकेमध्ये आपले खाते उघडले. दुसरीकडे नोटबंदी आणि कोरोना महामारी मुळे डिजिटलीकरण मोठ्या प्रमाणात झाले. या सगळ्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणुकीच्या घटना देखील वेगाने वाढल्या. दिवसेंदिवस आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी तसेच देशातील सर्व खातेधारकांसाठी महत्वाची सूचना दिलेली आहे. गुरुवारी एसबीआय बँकेने सर्व खातेदारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.
एसबीआयने आझादी का अमृत महोत्सव मोहीमेअंतर्गत लोकांना आर्थिक साक्षर बनवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीम अंतर्गत एसबीआय ने गुरुवारी एक ट्विट केले.या ट्विट मध्ये “क्यू आर कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा.” अशा फसव्या घोषणांपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.एसबीआय ने या Tweet सोबत एक छोटासा इंफोग्राफिक्स व्हिडियो सुद्धा पोस्ट केला. व्हिडीओमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची प्रक्रिया दाखवली आहे. त्याचबरोबर स्कॅन आणि स्कॅम याबद्दल देखील चर्चा केली आहे. कधीही अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नका आणि चुकून सुद्धा युपीआय पिन इंटर करू नका. एक दिवस आधी सुद्धा एसबीआयने असेच काहीतरी पोस्ट केले होते, जे ग्राहकांना फसवणुकीपासून घडणाऱ्या घटना पासून सावधान करेल. या बँकेने सर्व खातेधारकांना आपल्या नकळत होणाऱ्या आर्थिक घोटाळा पासून कसे वाचायचे? , याबद्दल देखील माहिती दिली होती. एसबीआय ने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमची सुरक्षितता हेच आमचे प्राधान्य आहे. सायबर गुन्ह्यांना cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन रिपोर्ट करा. जर तुम्हाला फोन, मॅसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून केवायसी अपडेट करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला तर या आमिषाला भूलू नका. कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत असताना पासवर्ड सोपा ठेवू नका.तुमचा पासवर्डची नेहमी बदलत राहा. बँकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी एसबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरच जाऊन भेट द्या.
दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या बँकेने सांगितले की, आर्थिक घोटाळा पासून संरक्षण मिळवायचे असेल तर लोकांनी काय करावे किंवा काय करू नये याबद्दल देखील साक्षर मोहीम मध्ये बँकेने काही गोष्टी सांगितल्या. तुमच्या खात्याशी निगडित असलेली कोणतीच वैयक्तिक माहिती लोकांशी शेअर करू नका तसेच तुमचा पासवर्ड सोपा ठेवू नका, जेणेकरून लोक या पासवर्डचा अंदाज सहज लावू शकतील. एटीएम कार्ड नंबर पिन ,यूपीआय, इंटरनेट बँक या संबंधित असलेली माहिती कुठेच लिहून ठेवू नका. सोशल मीडियावर पर्सनल माहिती चुकून सुद्धा शेअर करू नका. या सगळ्या गोष्टींमुळे तुमची सहजच फसवणूक केली जाऊ शकते.