#Corona
महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, मंत्रिमंडळाचा निर्णय……!
मुंबई दि.31 – महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
दरम्यान ,मास्क बद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मास्क वापरणे बंधनकारक नसून ऐच्छिक असणार आहे तरीही नागरिकांनी मास्क वापरावा असे म्हटले आहे.मात्र यामुळे मास्क नसेल तर दंड होणार नाही.