महाराष्ट्र
जेष्ठनेते शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल, राष्ट्रवादी चे कार्यकर्तेही आक्रमक….!
मुंबई दि.८ – कालच्या हाय कोर्टाच्या निर्णयाने उल्हासित झालेले एसटी कर्मचारी आज अचानक आक्रमक झाले. आणि एसटी महामंडळाच्या विलीनिकरणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर एसटीचे कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जोरदार आंदोलन केले.
एसटी महामंडळाच्या विलीनिकरणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर एसटीचे कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जोरदार आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार हाय हायच्या घोषणा देत संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. काही कर्मचाऱ्यांनी तर चपला फेकून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलाही मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र खासदार सुप्रिया सुळे ह्यांनी आंदोलकांमध्ये येऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कित्येक महिला आंदोलकांना चक्कर आल्याने खालीही कोसळल्याने दिसून आले.
दरम्यान सदरील घटनेची माहिती होताच स्वतः विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे.यावेळी राष्ट्रवादी चे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे दिसून आले. ते पडद्यामागून सदरील आंदोलन कुणीतरी पेटवण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.