#Social
रमेश तात्या गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग समाज प्रबोधन मेळावा संपन्न……!
औरंगाबाद दि.२२ – रमेश (तात्या) गालफाडे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने बुधवार दिनांक 20 एप्रिल रोजी मांगिर बाबा ( मांगवीर) यात्रे निमित्य शेंद्रा एम.आय.डी.सी. औरंगाबाद, येथे सकल मातंग समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. रमेश (तात्या) गालफाडे यां च्या कुशल मार्गदर्शनानुसार व माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली समाज प्रबोधन मेळाव्यास संपुर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव आलेले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राची महागायिका प्रथम पुरस्कार विजेती आयु. राधा ताई खुडे व महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका आयु. पंचशिला भालेराव तसेच प्रा.डॉ. संजय सांभाळकर यांचा शाल, पुष्पहार व स्मुर्तीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हास्ते भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मा. रमेश (तात्या) गालफाडे यांच्यासह सुविद्य पत्नी आणि चि. साईनाथ गालफाडे व त्यांच्या सह सुविद्य पत्नी या ही उपस्थीत होत्या. या प्रसंगी मा.शंकर भाऊ तडाके, प्रा.डॉ.संजय सांभाळकर, डॉ.उमाकांत राठोड़, मा.शरद अडागळे (संपादक), प्रतिभा ताई जोगदंड मा.अशोकराव सोनवणे, मा.बबन नेटके ईत्यादिनी मेळाव्यास बहुमोल मार्गदर्शन केले. रमेश तात्या गालफाडे यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात यावे तसेच जुन्या अनिष्ट रूढी अंधश्रद्धा या सोडून द्याव्यात, शिक्षणाने परिवर्तन होते त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. प्रबोधन मेळावा यशस्वी करण्याची महत्वाची जबाबदारी रमेश पाटोळे, प्रेमजीत बाबुराव गालफाडे, गालफाडे, नवनाथ लोंढे, जितेंद्र गालफाडे, क्रष्णा पांडव, राम गायकवाड, प्रा.कैलाश पाटोळे, सुधाकर धुंरणधरे, गोरख मोमीन यांनी पार पाडली.