#Sports

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का, जबरदस्त ”ऑल राऊंडर”चे अपघाती निधन……!

9 / 100

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू  अँड्र्यू सायमंड्स  याचं निधन झालं. अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा शनिवारी रात्री टाऊन्सव्हिले येथे अपघतात झाला.गंभीर जखमी झालेल्या सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, मात्र यश आलं नाही. क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितलं की, शहरापासून जवळपास ५० किमी अंतरावर पश्चिमेला हर्वे रेंज येथे रात्री अंदाजे १०.३० वाजता एक अपघात झाला.

                        अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपास वेगात असलेली कार रस्त्यावरच उलटून पडली. या कारमध्ये माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स होता.ही दुर्दैवी घटना एलिस रिव्हर ब्रिजजवळ घडली. घटनास्थळी आलेल्या रुग्णवाहिकेतून अँड्र्यू सायमंड्सला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी अँड्र्यू सायमंड्सला वाचवण्याचे पुरेपुर प्रयत्न केले.शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टर सायमंड्सला वाचवण्यात अपयशी ठरले. डॉक्टरांनी सांगितलं की, या अपघातात अँड्र्यू सायमंड्सला गंभीर दुखापत झाली होती. तो कारमध्ये एकटाच होता. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही त्याला वाचवता आलं नाही.

अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाचं इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र परसरलं. त्यानंतर सायमंड्सचा मृत्यू झाल्याचं कळताच त्याचे चाहते दुःखात बुडाले.४५ वर्षीय अँड्र्यू सायमंड्सच्या निधनावर चाहत्यांकडून दुःख व्यक्त केलं जात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलक्रिस्टनेही ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. हे खूपच वेदनादायी आहे, असं तो म्हणाला आहे.चालू वर्षात ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निधन झालं. रॉड मार्श, शेन वॉर्न आणि आता अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाने ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमींना आणखी धक्का बसला आहे.

अँड्र्यू सायमंड्सने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून खेळताना अनेकदा चमकदार खेळी केल्या आहेत. २६ कसोटी, १९८ एकदिवसीय आणि १२ टी२० क्रिकेट सामने ऑस्ट्रेलियाकडून खेळले आहेत. २००३ आणि २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेत अँड्र्यू सायमंड्स महत्त्वाचं योगदान होतं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close