आरोग्य व शिक्षण
केज तालुक्याचा निकाल ९५.९० टक्के……!
केज दि.८ – कोरोना नंतर घेण्यात आलेल्या ऑफलाईन परीक्षेचा बारावीचा निकाल घोषित झाला असून केज तालुक्यातील ३० महाविद्यालयाचा म्हणजेच तालुक्याचा निकाल ९५.९०% लागला आहे.
केज तालुक्यातील एकूण ३० महाविद्यालयातुन ४६१७ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी ४५६८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्यात १७६०, प्रथम श्रेणीत २१९६ द्वितीय श्रेणीत ४१३ तर उत्तीर्ण १२ असे एकूण ४३८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या निकालात १८७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये वसंत महाविद्यालय केज ९५.८४, सरस्वती कन्या महाविद्यालय केज ९९.१३, रामराव पाटील महाविद्यालय केज ९४.३८, जय किसान महा आपेगाव ९४.१४, युसुफ वडगाव महा.९७.८५, होळेश्वर महा.९८.२७, श्याम महा. दहिफळ वडमाऊली ९८.१६, आदर्श कन्या बन सारोळा महा. ९७.६४, जीवन प्रगती नांदूर घाट ९७.८९, छत्रपती शिवाजी महा.आडस ९३.४९, विठ्ठल विद्या.सारणी सांगवी ९१.३४, रामकृष्ण महा. बोरगाव ७६.६६, जय हनुमान विद्या.विडा ९७.९५, ज्ञानेश्वर माऊली विद्या. उत्तरेश्वर पिंप्री ९६.००, नूरजहाँ उर्दू विद्या, केज ९७.८७, काळेगाव घाट विद्या. ९३.९१, जनविकास बनसारोळा ९७.५३, वसुंधरा विद्या. पैठण ९९.२३, बनकरंजा विद्या. ९६.४२, विश्वनाथ कराड महा, केज ९२.५९, बुवासाहेब पाटील विद्या.शिंदी ९५.६५, बाबुराव मुंडे पाटील विद्या, देवगाव ९४.६९, चांगदेव तांबडे विद्या, पिट्टी घाट ९२.५९, नंदीग्राम विद्या,नांदूर घाट ९६.३४, वसुंधरा विद्या, कानडी बदन ९०.९०, जीवनविकास विद्या, केज ९६.३६, गणेश विद्या.तांबवा ९०.००, जीवन शिक्षण विद्या.गांजपुर ९४.१८ तर चाटे स्कूल केज चा निकाल १०० टक्के लागला आहे.
तालुक्यातील सारणी (आ.) येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकालही ९८.५६ टक्के लागला असून विज्ञान शाखेत १९४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी १७५ विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेत ८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ४३ विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर ३९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेचे सचिव राहुल सोनवणे, प्राचार्य पी.एच.लोमटे यांच्यासह सर्व कर्मचारी वृंदानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.