हवामान
”या” दहा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज…….!
राज्यात बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती मात्र आता आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मागच्या जवळपास दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकून घ्यावीत असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान कोल्हापूर, सातारा,मराठवाडा भागात काल (४) हलक्या पावसाने हजेरी लावली. तर राज्यातल्या अनेक भागात ढगाळ हवामान राहिले.
हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 10 जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.