आपला जिल्हा
बीड जिल्हा पुन्हा पोरका झाला – खा. रजनीताई पाटील…..!
शिवसंग्रामचे संस्थापक बीड जिल्ह्याचे सुपुत्र माजी आ.विनायक मेटे यांचे झालेले अपघाती निधन मनाला चटका लावणारे आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून घडलेले हे नेतृत्व होते. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेले ते नेते होते.
विनायक मेटे हे केवळ मराठा समाजाचेच नाही तर सकल समाजाचे ते नेते होते. अतिशय सामान्य कुंटुंबातुन आलेले प्रचंड आत्मविश्वास जिद्द व मेहनतीची पराकाष्ठा म्हणजे विनायकराव मेटे.
शिवसंग्रामच्या माध्यमातुन त्यांनी उत्तम संघटन व भरीव सामाजिक कार्य केले. सरकार कोणतेही असो त्यांचे सर्वांशी अतिशय चांगले संबध असायचे. बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. बीड चा परत एक उद्धारकर्ता आपण गमावला असून ही पोकळी आता भरून निघने कठीण आहे.
विनायक मेटे यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व पाटील परिवार सहभागी आहोत. या धक्क्यातून त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना. अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.