शिक्षकांना दिले जाणार शेतीचे धडे……!
मुंबई दि.१६ – शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांसाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी शिक्षकांना देखील शेतीचे प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा अद्याप प्रत्यक्षात सुरु झालेली नाही. पाचवीपासून शेतीचे धडे देणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले आहे. अब्दल सत्तार यांनी एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. शेतीत तरुणांना निपुन करण्याच्या उद्देशाने हे धोरण राबवण्यात येणार आहे. शेतीमध्ये अनेक छोटे-मोठे प्रकार असतात. गायींना चारा कसा द्यायचा अशा अनेक गोष्टी असतात. या सर्वाचे प्रशिक्षण लहानपणापासून विद्यार्थ्यांना शिकवल्या तर याचे परिणाम भविष्यात चांगले दिसून येतील.
दरम्यान, नोकरी नाही मिळाली तर त्यांना शेतीदेखील करता येत नाही. जर त्याला लहानपणापासून शेती कशी करावी याचे शिक्षण दिले तर शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतील. यामध्ये नांगर धरण्यापासून अधुनिक शेतीचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे.