आरोग्य व शिक्षण
मधुमेहावरील प्रभावी औषध बाजारात दाखल……!
केंद्र सरकारने मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना मोठा दिलासा आहे. Sitagliptin हे मधुमेहावरचं प्रभावी औषध बाजारात दाखल केले आहे. या गोळ्यांची किंमत ऐकून तुम्ही म्हणालं, बरं झालं या लुटणाऱ्या कंपन्यांना दणका दिला.
या Sitagliptin गोळ्या अत्यंत स्वस्त उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 10 गोळ्या अवघ्या 60 रुपयांना मधुमेही रुग्णांना मिळणार आहे. देशातील जनऔषधी विक्री केंद्रावर या गोळ्या उपलब्ध होतील.
फॉर्मास्यूटिकल्स आणि मेडिकल डिवायसेस ब्यूरो ऑफ इंडिया (PMBI) यांनी त्यांच्या जन औषधी केंद्रांच्या यादीत Sitagliptin गोळ्यांचा समावेश केला आहे. Sitagliptin च्या 50 मिलीग्रॅम च्या 10 गोळ्यांचे किरकोळ विक्री मूल्य 60 रुपये आहे. 100 मिलीग्रॅम गोळ्यांचे पाकिट 100 रुपयांना मिळणार आहे.
देशात सध्याच्या घडीला मिळणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांच्या मधुमेहावरील औषधांपेक्षा ही औषधे 60 ते 70 टक्के कमी किंमतींना मिळत आहे.
सध्या मधुमेहावरील ब्रँडेड कंपन्यांच्या औषधांची किंमत 160 ते 258 रुपयांपर्यंत आहे. त्यापेक्षा सरकारने नव्याने दाखल केलेले औषध प्रचंड स्वस्त आहे.
पंतप्रधान जनऔषधी योजनेतंर्गत देशभरात 8700 जनऔषधी केंद्र उघडण्यात आली आहे. यामध्ये स्वस्तात 1600 हून अधिक औषधी आणि 250 उपकरणे उपलब्ध आहेत. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च -इंडिया (ICMR) च्या अंदाजानुसार, सध्या भारतात 7.40 कोटी लोक मधुमेहाचे शिकार आहेत. त्यांचा औषधांचाच खर्च कोट्यवधी रुपये आहे. देशात मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत असलेली अनेक रुग्ण पुढील गंभीर स्वरुपाच्या या आजाराला बळी पडत आहे. त्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे ICMR ने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, डॉ. वी. मोहन हे स्टडी के ऑथर या संस्थेचे प्रमुख आहे. त्यांच्या अंदाजानुसार, 2045 मध्ये भारतात मधुमेही रुग्णांची संख्या 13.5 कोटी म्हणजेच जवळपास दुप्पट होईल. याचा अर्थ येत्या 20 वर्षांत रुग्णसंख्या दुप्पट होईल.