हवामान
परतीचा पाऊस अनेक जिल्ह्यांना झोडपणार……!
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या हलक्या सरी किंवा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आलं आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.विजांसह पावसाचा इशारा कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.