आता लग्नासाठी 50 नाही तर 10 लोकांनाच परवानगी…..
बीड – लग्न समारंभासाठी आतापर्यंत 50 लोकांना ठरवून दिलेल्या अटी व शर्तीवर मान्यता देण्यात आलेली होती. परंतु लग्न समारंभातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यात बदल करण्यात आला असून आता केवळ 10 लोकांनाच परवानगी मिळणार असल्याचे आदेश बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छीन्द्र सुकटे यांनी दि.१२ जुलै रोजी काढले आहेत.
लॉक डाउन मध्ये लग्न समारंभासाठी ५० लोकांना परवानगी होती. मात्र बीड जिल्ह्यात मागच्या कांही दिवसांत लग्न समारंभातून कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने नियमांत बदल करण्यात आला आहे. तसेच 10 लोकांना जरी परवानगी असली तरी आयोजकाला तीन दिवस अगोदर लग्नाची परवानगी संबंधित पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत कडून घ्यावी लागणार असून सोशेल डिस्टनसिंग व इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तर संबंधित मुख्याधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर सदरील लग्न समारंभात नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे आयोजकांना योग्य खबरदारी घेऊनच कार्यक्रम करावा लागणार आहे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.