#Missing
केज तालुक्यातील दोन मुले बेपत्ता…..!
केज दि.२८ – अज्ञात व्यक्तीने १६ वर्षीय मुलगा व त्याच्या मित्राचे अपहरण केल्याची घटना मस्साजोग ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मस्साजोग ( ता. केज ) येथील सुमित विकास रोडे ( वय १६ ) व त्याचा मित्र गोवींद आश्रुबा पाळवदे ( रा. सासुरा ता. केज ) हे दोघे सोबत असताना २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मस्साजोग व सासुरा या ठिकाणाहून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. सुमित याच्या अंगावर गुलाबी शर्ट, नीळी जीन्स आणि त्याचा रंग गोरा, उंची पाच फुट, नाक सरळ आहे. त्याचे वडील विकास लिंबाजी रोडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करत आहेत.