प्रकाश नामदेव खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील बोरीसावरगांव गावात दि. 26/01/2015 ला दारू बंदी बाबत एकमताने ठराव मंजुर करण्यात आला होता. परंतु सदरच्या ठरावाची अंमलबजावणी आजपर्यंत करण्याबाबत संबंधित अधिकारी कठोर भुमीका घेत नाहीत. त्यामुळे सदरचा प्रस्ताव हा बहुमताने पास होऊन सुध्दा रेंगाळलेला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच वरील तारखेपासून गावातील दारूच्या दुकानाचे परवाने रद्द करण्यात यावेत.तर सदरील दिनांकानंतर नवीन दारूच्या दुकानास परवाने देण्यात येऊ नये. अन्यथा नवीन दारूच्या दुकानास परवानगी दिली तर त्याची सर्व जबाबदारी ग्रामसेवक व प्रशासनावर राहील,असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, संबंधीत अधिकाऱ्याला आदेश देवून गावातील दारूचे दुकाने बंद करणे बाबत तात्काळ आदेश द्यावेत व गावात निर्मल वातारवण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून सोबत २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या ठरावाची प्रतही जोडली आहे. तर सदरील दिरंगाई बाबत सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेविका श्रीमती मुळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता सदर ठराव माझ्या कार्यकाळात घेतलेला नसल्याने अद्यापपर्यंत माझ्यापुढे हा विषय आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.