दिव्यांग व्यक्तींना होणार विविध साहित्याचे वितरण…..!
बीड दि.२३ – सामाजिक न्याय व अधिकारता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण सेंटर, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद बीड व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रीम अवयवांचा पुरवठा करणे या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सोमवार दि.२० फेब्रुवारी ते दि.२४ फेब्रुवारी दरम्यान तालुकास्तरावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दिव्यांगांनी तसेच गरजूंनी लाभ घेण्यासाठी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड व प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना कृत्रीम अवयवांच्या साहित्यासाठी सोमवार दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय माजलगांव व उपजिल्हा रुग्णालय, गेवराई, तर मंगळवार दि.२१ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय परळी व सामाजिक न्याय भवन बीड , तर बुधवार दि.२२ फेब्रुवारी रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालय अंबाजोगाई व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरुर, तसेच गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय धारुर व उपजिल्हा रुग्णालय पाटोदा, तसेच शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय वडवणी व उपजिल्हा रुग्णालय आष्टी येथे शिबीर होणार आहे तर 25 फेब्रुवारी रोजी केज येथे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. तरी गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.