बीड दि.२९ – माजलगाव तालुक्यातील उमरी येथील शेतमजूर पालकांच्या मुलाने दहावी परिक्षेत सर्वच्या सर्व विषयात ३५ गुण घेऊन एक अनोखा विक्रम केला आहे. धनंजय हा सर्व विषयात ३५ गुण घेणारा जिल्ह्यातील पहीलाच विद्यार्थी असल्याची चर्चा आहे.
उमरी येथील नारायण नखाते यांना तिन मुले. दोन मुले शेतमजुरी करतात तर धनंजय हा गावातील रामेश्वर विद्यालयात दहावी मध्ये शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे त्याला कसल्याही प्रकारचे क्लासेस नव्हते. शाळेच्या सुट्टी मध्ये आई वडीला बरोबर शेता काम करण्यासाठी जात असे. वर्षभर जिद्दीने काही तरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द त्याने मनी बाळगली होती. मात्र आगळावेगळा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला असून दहावीच्या परीक्षेत सर्वच्या सर्व विषयात तो ३५ – ३५ गुण घेऊन पास झाला आहे. मात्र शेतात काम करून मिळवलेल्या या गुणांवरही त्याच्या मोठ्या भावांना व आई वडीलांना अभिमान आहे. तसेच सर्वत्र त्याचे कौतुकही होत आहे. आज जेवढी चर्चा १००% वाल्यांची नाही तेवढी धनंजय ची होत आहे एवढे मात्र खरे……!
मागच्या कांही वर्षांपूर्वी कोल्हापूर तालुक्यातील एक विद्यार्थी असाच ३५-३५ गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता अन त्याचे सर्वत्र बॅनर झळकले होते.