एएसपी पंकज कुमावत यांच्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड….!
केज दि.६ – तालुक्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या एका धाडसी कारवाईत चंदनाचा शोध घेणाऱ्या पोलीस पथकाला देशी कट्टा, पिस्टल, काडतुसे आणि हत्यारे हाती लागली यामुळे खळबळ माजली आहे.
अधिक माहिती अशी की, दि. ५ मे रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त माहिती मिळाली की, होळ येथील हनुमंत मधुकर घुगे हा चोरून तोडून आणलेल्या चंदनाच्या झाडाची खोडे होळ शिवारातील बरड नावाच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली चोरटी विक्री करण्यासाठी तासित आहे. पोलीसांना अशी खात्रीलायक माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वतः पंकज कुमावत साहेब व त्यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, राजीव वंजारे, विकास चोपणे, गोविंद मुंडे, बजरंग इंगोले, मुकुंद ढाकणे, शिनगारे सायंकाळी ६:०० वा. छापा मारला. त्या ठिकाणी दोन इसम चंदनाचे खोड तासीत असताना आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्याचे नाव हनुमंत मधुकर घुगे, (रा. होळ) व चंदनशिव मेघराज गायकवाड (रा. तांदूळजा ता. जि. लातूर) असे सांगितले. त्यांचे ताब्यातून ४५ किलो चंदन दोन मोटरसायकली, मोबाईल, लोखंडी तराजू, वजन-मापे हे साहित्य मिळून आले.
आरोपी हनुमंत मधुकर घुगे यास अधिक विश्वासात घेऊन आणखी चंदनाचा माल कोठे ठेवला आहे? असे विचारले असतात त्यांनी सांगितले की, होळ गावातील होळ ते केज जाणाऱ्या रोड वरील जिनिंग जवळील त्यांचे मालकीचे जिममध्ये ठेवला आहे. असे सांगितले. होळ येथील जिममध्ये आरोपीसह जाऊन जिमची पाहणी केली असता जिममध्ये तयार चदनाचा गाभा, दोन लोखंडी, एक रामपुरी चाकू, एक गावठी कट्टा, जिवंत ७ काडतूस, एक गावठी पिस्टल, ८ जिवंत काडतूसे असे एकूण २ लाख ८४ हजार ४०० रु. मुद्देमाल मिळून आला. पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरून भा दं वि ३७९, ३४, भारतीय वन विभाग अधिनियम (एफ) ४१, ४२, २६ यासह भारतीय शस्त्र प्रतिबंधक कायदा ३/२५, ४/२५ नुसार युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे करीत आहेत.
दरम्यान केज तालुक्यात काडतूसासह गावठी कट्टा आणि पिस्टल आणि इतर हत्यारे सापडली असल्याने खळबळ माजली आहे.