केज दि.३ – तालुक्यतील साळेगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे साळेगाव येथे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून सर्व व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
केज तालुक्यतील साळेगाव येथिल युवक हा कोरोना संसर्गित आढळूनआला आहे. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी साळेगांव येथे कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. तर केज शहरातील आनंदनगर तसेच तालुक्यातील कळंबआंबा या ठिकाणचा कंटेन्मेंट झोन शिथिल करण्यात आला आहे.
दरम्यान दि.३ रोजी केज तालुक्यातील 30 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली आहे.