मागच्या आठ दिवसांपासून रखडलेले खातेवाटप अखेर जाहीर…..!
मुंबई दि.१४ – गेल्या आठ दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीला खाते देण्यावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता. मात्र, आता खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाकडील कृषी खातं आपल्याकडे खेचून आणण्यात यश आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यामध्ये अजित पवार – अर्थ, नियोजन
छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण
धर्मरावबाबा अत्राम- औषध व प्रशासन, दिलीप वळसे पाटील – सहकार, धनंजय मुंडे – कृषी
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण,
अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन,
आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण, संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे खाते मिळाले आहे.