स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या…..!
LCB captured history sheeter criminal, who was underground since a year
बीड दि.२० – एक वर्षापासून फरार असलेला आरोपी मंगळवारी ((दि.१८) रोजी जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने केली. त्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदर आरोपीने रोडवर जॅक टाकून ट्रक चालकास शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते.
विक्रम आप्पा शिंदे (रा. नांदूरघाट ता.केज) असे आरोपीचे नाव आहे. 23 में 2022 रोजी मस्साजोग शिवारात रस्त्यावर जॅक टाकला, त्याच्या अमिषाने खाली उतरलेल्या ट्रका चालकास शस्त्राचा धाक दाखवत लुटले होते. यातील निष्पन्न असलेला आरोपी विक्रम शिंदे हा तेंव्हापासून फरार होता. मात्र मंगळवारी (दि.१८) रोजी नांदूरघाट येथून त्याला ताब्यात घेतले.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, पोह रामदास तांदळे, बालकृष्ण जायभाये, राजु पठाण, भागवत शेलार, अर्जुन यादव, अतुल हराळे यांनी केली. पुढील तपासकामी आरोपीस केज पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.