#Social
वेळूवन बुद्ध विहार भीम नगर केज येथे श्रावण पौर्णिमा साजरी….!
केज दि.३ – वेळूवन बुद्ध विहार भीम नगर केज येथे श्रावण पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा पूर्वचे संघटक आयुष्यमान अरुण पटेकर, भारतीय बोध महासभा तालुका शाखेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मस्के, शहर शाखेचे सरचिटणीस आयुष्यमान जयपाल मस्के, शहर शाखेचे संस्कार विभागाचे चंद्रकांत मस्के, शहर शाखेचे सदस्य सचिन वाघमारे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीपा ने धूपाने व पुष्पाने आपल्या आदर्शांची पूजा करण्यात आली,.व नंतर सर्व उपासक उपासिका तथा बालक बालिका या सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
वर्षावासामधील धम्म प्रवचन मालिकेतील धम्म प्रवचन देण्यासाठी आलेल्या आयुष्यमान अरुण पटेकर बीड जिल्हा पूर्व संघटक यांचे पुष्पगुच्छ देऊन भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष नंदकुमार मस्के यांनी त्यांचे स्वागत केले.तर पटेकर यांनी भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पूर्व शाखा च्या नियोजनाप्रमाणे त्यांनी आपल्या धम्म प्रवचन मालिकेमधील विषय पहिला पराभवसुत् या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अधिक श्रावण पौर्णिमेचे महत्त्वही त्यांनी सविस्तर पटवून दिले. नंतर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मस्के यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आपले विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी भिमाई महिला सेवाभावी संस्थेच्या सर्व महिला व पदाधिकारी उपस्थित होत्या. भीम नगर मधील बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर शाखेचे सरचिटणीस आयुष्यमान जयपाल मस्के यांनी केले. तर श्रावण पौर्णिमेनिमित्त सर्व उपासक उपासिका बालकथा बालिका यांना मंगलमय शुभेच्छा तालुकाध्यक्ष नंदकुमार मस्के यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर शाखेचे सदस्य आयुष्यमान सचिन वाघमारे यांनी केले व शेवटी सरणत् घेऊन श्रावण पौर्णिमेच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.