#Job
आरोग्य विभागात पहिल्यांदाच होतेय मेगा भरती…..!
मुंबई दि.२९ – कित्येक वर्षांपासून राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. पण आता या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागात 11 हजार पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आज जाहिरात निघणार आहे. तसेच ही भरती प्रक्रिया TCS मार्फत राबवली जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यकरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
आरोग्य भरती गेल्या 3 वर्षांपासून रखडली होती. यामध्ये ’क’ आणि ‘ड’ गटातील एकूण 10 हजार 949 पदांची होणार मेगाभरती होणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारचे विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया 2021 मध्ये सुरू असताना पेपर फुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा सुरु होणार आहे.