शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा हा सण राज्यात दि. 14 सप्टेंबर गुरुवारी साजरा होत आहे. मात्र सध्या राज्यभरात जनावरांवर लंम्पी या आजाराचे सावट आहे. बीड Beed जिल्ह्यातही लंम्पीग्रस्त Lumpy जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यात 168 गोवंशीय जनावरे लंम्पीग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. सदरील चर्मरोग हा संसर्गजन्य असल्यामुळे जनावरे एकत्र आल्यास त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे Collector Deepa Mudhol यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गीक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नूसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा सणानिमित्त व एकत्र येण्यास व मिरवणूक काढण्यास सक्त मनाई आदेश काढले आहेत. तसेच पशुपालक व शेतकऱ्यांनी घरगुती स्वरुपात बैलपोळा Pola सण साजरा करण्याचे आवाहन केले.