#Jobमहाराष्ट्र
तरुणांना सरकारी नौकरीची मोठी संधी….!
केज दि.१८ – मागच्या बऱ्याच वर्षांनंतर सरकारी नौकारीची मोठी संधी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागा मार्फत कृषी सेवक पदांसाठी भरती होणार असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. Diploma holder candidate may apply, govt job alert in agri department of maharashtra
महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीने कृषी पदविका झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 14 सप्टेंबर रोजी झाली असून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. सदरील भरती प्रक्रियेमध्ये एकूण 2070 कृषी सेवकांच्या जागा भरण्यात येणार असून यासाठी कृषी पदविका झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 18 ते 40 आणि मागासवर्गीय प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी रुपये 900 रुपये फीस म्हणून करण्यात येत आहे.
दरम्यान, सदरील अर्ज हे ऑनलाइन भरायचे असून मागच्या अनेक वर्षांनंतर कृषी खात्यात मोठ्या प्रमाणावर कृषी सेवकांची भरती होत असल्याने तरुणांना सरकारी नौकरीची संधी उपलब्ध झाली आहे.