केज येथील तहसील कार्यालय परिसरातील व संरक्षण भिंतीलगत असलेले अतिक्रमण काही महिन्यापूर्वी हटविण्यात आले होते. त्यानंतर एक टपरी अतिक्रमण हटविलेल्या जागेवर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येताच तहसीलदार अभिजित जगताप यांनी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास केज सज्जाचे तलाठी साहिल इनामदार यांना फोन करून ती नवीन टपरी ठेवली, दुसऱ्या टपऱ्या व दुकाने बसतील. म्हणून आताच जाऊन ती टपरी संबंधितास काढण्याबाबत सांगून काढा. त्यांच्या आदेशावरून दुपारी १ वाजता तलाठी साहिल इनामदार व दुसरे तलाठी फजल शेख हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी टपरी शेजारी असलेले गाळ्याचे मालक आरेफ मौजन व त्याचा भाऊ साजेद मौजन या दोघांना टपरीबाबत विचारणा केली असता त्यांनी टपरी आम्ही ठेवल्याचे सांगितले. तहसिलदार यांनी टपरी काढण्याबाबत सांगितले असून ती काढून घ्या. असे बोलताच त्या दोघांनी टपरी काढणार नाहीत. तू कोण सांगणार असे म्हणत एसडीएम. झाडके यांच्याविरूद्ध कोर्टात खटला दाखल केलेला आहे. तू काय करणार आहेस, तुझी लायकी आहे का असे म्हणत अंगावर धावून येत ढकलून देऊन शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा केला आहे. तू जर परत टपरीकडे आलास तर जिवे मारण्याची धमकी ही दिली. अशी तक्रार तलाठी साहिल इनामदार यांनी दिल्यावरून आरेफ मौजन, साजेद मौजन या दोघा भावाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून फौजदार राजेश पाटील तपास करताहेत.