क्रीडा व मनोरंजन
चि.विश्वदिप खोडसे चे धनुर्विद्या स्पर्धेत यश….!
केज दि.25 – येथील प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये बीड जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये नोंदविला होता.
बीड जिल्हास्तरीय अंतर शालेय घेण्यात आलेल्या धनुर्विद्या स्पर्धेत न्यु व्हिजन पब्लिक स्कूल अंबाजोगाई चा विद्यार्थी व केज तालुक्यातील नायगाव येथील चि. विश्वदिप रत्नेश्वर खोडसे U 14 वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची अंतर शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विश्वदिपच्या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नातेवाईक यांच्याडून कौतुक करण्यात येत आहे. ही स्पर्धा बीड जिल्हा आर्चरी असोसिएशनचे सेक्रेटरी शैलेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका गितांजली कुलकर्णी यांनी दिली.