व्हायरल
तब्बल चौथ्या दिवशी ”नेट” करी लागले जोमाने कामाला….!
केज दि.३ – मराठा आरक्षण मागणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून इंटरनेट बंद करण्यात आले होते.त्यामुळे सोशल मीडियाचे व्यसन लागलेले नेटकरी हतबल झाले होते. मात्र शुक्रवारी दुपारी बारा च्या दरम्यान इंटरनेट सुरू करण्यात आल्याने नेटकरी कामाला लागले आहेत.
मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने बिक्स जिल्ह्यात आंदोलक आक्रमक झाले होते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून कांही अफवा पसरू नयेत म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले होते.यामध्ये कांही अत्यावश्यक आस्थापना वगळता इंटरनेट पुर्णतः बंद केले होते. आणि याचा परिणाम म्हणून संपूर्ण मेसेजिंग यंत्रणा ठप्प झाली होती.
दरम्यान, सोशल मीडियाचे व्यसन लागलेले नेटकरी मात्र मोठ्या प्रमाणावर हैराण झाले होते.परंतु मनोज जरांगे पाटील यांनी तूर्त कांही कालावधीसाठी उपोषण थांबवल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचे लक्षात आल्यानंतर इंटरनेट पुन्हा सुरू करण्यात आल्याने नेटकरी मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत.