क्राइम
एएसपी पंकज कुमावत यांची धडाकेबाज कारवाई….!
बीड दि.१० – सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची बीड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पत्त्याच्या क्लब वर धाड 17 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेसह एकूण 25 आरोपी वर गुन्हा दाखल करुन एकूण किमती 11,80,050/-(अकरा लाख एंशी हजार पन्नास रुपये) रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की चऱ्हाटा फाटा ता.जि. बीड येथे तुकाराम नगरच्या पाठीमागे तांदळे यांच्या शेडमध्ये काही इसम अंदर बाहर नावाचा जुगार पत्त्याच्या पानावर पैसे लावून खेळत आहेत, अशी माहिती मिळाल्याने स्वतः पंकज कुमावत यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे सह सदर ठिकाणी दिनांक 09/11/2023 रोजी 19.30 वाजता रेड करुन 17 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेसह एकूण 25 आरोपी वर गुन्हा दाखल करुन नमूद आरोपी कडून एकूण किमती 11,80,050/-(अकरा लाख एंशी हजार पन्नास रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण 25 आरोपी विरुद्ध पोलीस नाईक दिलीप गीते यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतः ASP पंकज कुमावत सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज व त्यांच्या पथकातील पीएसआय आनंद शिंदे, बाबासाहेब डापकर, दिलीप गीते, अनिल मंदे, भरत शेळके, गोविंद मुंडे, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा तसेच rcp बीड येथील राठोड, जाधव, खेडकर, धनवे व पवार यांनी केली आहे